श्री जोगेश्वरी देवी

इतिहास

 

महाराष्ट्रात छत्रपति संभाजीनगर जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, जगप्रसिद्ध कोरीव लेण्या आहेत. यात वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, छत्रपति संभाजीनगर शहरातील औरंगजेब बादशाह ने बांधलेल्या बीबी का मकबऱ्याची भव्य प्राचीन वास्तु, पाणचक्की तसेच अजिंठा वेरूळ येथील जगप्रसिद्ध कोरीव लेण्या आहेत.

अजिंठा, वेरूळ या लेण्याप्रमाणेच समकालीन अजिंठा पर्वतातच खान्देश व मराठवाड्याच्या सरहद्दीवरील घाटनांद्रा ता. सिल्लोड येथील भव्य असे आई भगवती जोगेश्वरी देवीची अतिशय प्राचीन अशी कोरीव लेणी आहे. अतंत्य जाज्वल्य व जागृत साडे तीन शक्तिपीठांपैकी श्री जोगेश्वरी देवी हे आद्य स्वयंभू उपशक्तीपिठं आहे.

छत्रपति संभाजीनगर च्या उत्तरेस ९० कि.मी. अंतरावर असलेल्या अजिंठा डोंगराच्या कुशीत आई जोगेश्वरी देवीचा निवास आहे. इथली हिरवीगार वनराई, पाण्याचे धबधबे, पक्षी, फुलपाखरे, फुले, प्राणी आदी आपले मन मोहित करतात.कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीच्या लेण्यांचे बांधकाम अतिशय प्राचीन आहे.

अधिक माहिती

वार्षिक उत्सव

श्री जोगेश्वरी देवी मंदिरावर अश्विन नवरात्रोत्सव, चैत्र नवरात्रोत्सव व कार्तिक नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. तसेच श्रीराम नवमी, हनुमान जयंती, गोकुळ अष्टमी, कोजागिरी, महाशिवरात्र, चतुर्दशी हे उत्सवही साजरी केली जातात

अधिक माहिती

देणगी


देणगीबद्दल माहिती   दान करा

 

विश्वस्त मंडळ

श्री जोगेश्वरी देवीच्या दर्शनाला येणार्‍या भक्तांना मूलभूत अत्यावशक सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थान तत्पर आहे. श्री जोगेश्वरी देवी मंदिराची पुर्वी साधारण सन.१९६७ ते १९९८ पर्यंत मंदिराची देखभाल मा. तहसिलदार सो यांचे कडून केली जात असे. सन. १९९९ पासून नोंदणीकृत मंडळाकडुन मंदिराचा कारभार पहिला जातो. श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा ता. सिल्लोड, जि. छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३. (रजि. नं. ए. २१७८).

अधिक माहिती

संस्मरणीय वेळ

  • संपर्क

    श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा. (रजि. नं. ए. २१७८)
           ता. सिल्लोड, जि. छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३.

    मो: ९४२१४०२२१३, ९९२३०१४६६७

    ई-मेल: jogeshwarideviorg@gmail.com

    ई-मेल नोंदणी


    श्री जोगेश्वरी देवी बद्दलची नवीन माहिती या ई-मेल द्वारे तुम्हाला पुरवली जाईल.

     

    © Copyright 2018. All Rights Reserved.