श्री जोगेश्वरी देवी

देवीचे उत्सव

श्री जोगेश्वरी देवी मंदिरावर अश्विन नवरात्रोत्सव, चैत्र नवरात्रोत्सव व कार्तिक नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. तसेच श्रीराम नवमी, हनुमान जयंती, गोकुळ अष्टमी, कोजागिरी, महाशिवरात्र, चतुर्दशी हे उत्सवही साजरी केली जातात

श्री जोगेश्वरी देवी संस्थानाच्या प्रयत्नाने येथे विद्धुत रोशनाई, पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या, परिसरात वृक्ष व बगीचा लावून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. तसेच विकासाची अनेक कामे सुरु आहेत. त्या करीता भाविकांनी सढळ हाताने मदत करावी असे विनम्र आवाहन. भाविकांच्या मौलिक सूचनांचा आम्ही नेहमीच आदर करतो.

 

जोगेश्वरी देवीची दैनंदिन पूजाअर्चा

 

प्रात:काळी६ वाजताकाकड आरती
सकाळी८ ते १० वाजतापंचामृत अभिषेक, महापुजा, आरती
दुपारी१२ वाजतामहानैवैद्य व आरती
सायंकाळी७ वाजतासायं. आरती

 

 

श्री जोगेश्वरी मंत्र देवीची आरती

श्री जोगेश्वरी मंत्र

ओम नमो दैव्ये महादैव्ये शिवायै सततं नमः | नमः प्रकृत्ये भद्राये नियता: प्रणता: स्म ताम ||
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके | शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते ||

श्री जोगेश्वरी देवीची आरती

ओम जोगेश्वरी देवी माता, जय भुवनेश्वरी माता,
आरती तुज ओवाळू, कृपा करी भक्ता || धृ ||

कुंकूम चंद्र प्रभा तव भाळी, ब्रह्मांडी पसरे |
किती पितांबर झळके, वंदन मधुर हसरे || १ ||

पदन्यास काई माता, ऋणझुणती नुपुरे |
कंकण करि किण किणती मंजुळ नाद भरे || २ ||

मृदूल सुकोमल माता, मृगनयनी शोभे |
कमळासम मुख धावती, भ्रमर जिथे लोभे || ३ ||

राजस रूप मनोहर माता, सुवर्ण तव कांती |
तारा लखलखती जणू, रत्ने किरीटी किती || 4 ||

विविध आयुध धरि माता, सिंहारूढ होसी |
मारिशी महिषासुर गे | रौद्र रूप धारीशी || ५ ||

यु करुणा मयी जननी, ममतेची सरिता |
घेशी भक्ता पदरी, भव सागरी बुडता || ६ ||

ओम जय जोगेश्वरी माता, जय भुवनेश्वरी माता.....|| धृ ||

आरती श्री जोगेश्वरीची

जय देवी जय देवी जय जोगेश्वरी जननी |
आरती ओवाळीतो तुजिया पावन चरणी ||

तूच निर्मिलेस विश्व सारे
आकाश प्रकाश कोटी कोटी तारे |
तुझ्या हाती जन्म मरणाचे फेरे
रंग रसांनी नटविलीस सारी ही अवनी ||

शिवशक्ती आई तु योगिनी
मुक्त केलीस सारी धरणी |
आदि जननी तुच जीवन संजीवनी
करुणा कर शरण शरण तवचरणी ||

सहस्र सुर्याचे तेज तव शरिरात
शितलता शत चंद्राची नयनात |
ग्रह नक्षत्रांच्या माळा कंठात
सर्व तीर्थाचे मांगल्य तुजिया चरणी ||

कर आई विघ्नांचे निरसन दुर्धर रोगाचे
निर्मुलन दुख: दारिद्रयाचे दहन |
फळा फुलांनी धन धान्यानी
वहरू दे धरणी ||

संपर्क

श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा. (रजि. नं. ए. २१७८)
       ता. सिल्लोड, जि. छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३.

मो: ९४२१४०२२१३, ९९२३०१४६६७

ई-मेल: jogeshwarideviorg@gmail.com

ई-मेल नोंदणी


श्री जोगेश्वरी देवी बद्दलची नवीन माहिती या ई-मेल द्वारे तुम्हाला पुरवली जाईल.

 

© Copyright 2018. All Rights Reserved.