श्री जोगेश्वरी देवी

इतिहास

महाराष्ट्रात छत्रपति संभाजीनगर जिल्ह्यात अनेक प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, जगप्रसिद्ध कोरीव लेण्या आहेत. यात वेरूळचे घृष्णेश्वराचे मंदिर, छत्रपति संभाजीनगर शहरातील औरंगजेब बादशाह ने बांधलेल्या बीबी का मकबऱ्याची भव्य प्राचीन वास्तु, पाणचक्की तसेच अजिंठा वेरूळ येथील जगप्रसिद्ध कोरीव लेण्या आहेत.

अजिंठा, वेरूळ या लेण्याप्रमाणेच समकालीन अजिंठा पर्वतातच खान्देश व मराठवाड्याच्या सरहद्दीवरील घाटनांद्रा ता. सिल्लोड येथील भव्य असे आई भगवती जोगेश्वरी देवीची अतिशय प्राचीन अशी कोरीव लेणी आहे. अतंत्य जाज्वल्य व जागृत साडे तीन शक्तिपीठांपैकी श्री जोगेश्वरी देवी हे आद्य स्वयंभू उपशक्तीपिठं आहे.

छत्रपति संभाजीनगर च्या उत्तरेस ९० कि.मी. अंतरावर असलेल्या अजिंठा डोंगराच्या कुशीत आई जोगेश्वरी देवीचा निवास आहे. इथली हिरवीगार वनराई, पाण्याचे धबधबे, पक्षी, फुलपाखरे, फुले, प्राणी आदी आपले मन मोहित करतात.कुलस्वामिनी जोगेश्वरी देवीच्या लेण्यांचे बांधकाम अतिशय प्राचीन आहे.

या लेणीचे काम इ.स. ७१२ मध्ये राष्ट्रकूट तिसरा गोविंद राजा यांचा पुत्र अमोघवर्ष राष्ट्रकुटांच्या कालावधीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. याच राष्ट्रकूट राज्याने वेरूळच्या लेण्यांमध्ये कैलास मंदिर उभारले आहे असे म्हटले जाते. या जोगेश्वरी देवीच्या मंदिरात राष्ट्रकूट कालीन शिलालेख असून तो पाली भाषेत असावा असा अंदाज आहे.

या कोरीव लेण्याचे दोन ताल असून खाली पूर्ण पाणी आहे, तर वरच्या मजल्यावर मंदिर आहे. मंदिराच्या समोरच सुमारे ३० फूट उंच दीपमाळ आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच शिव व पार्वतीची सुमारे ७ फूट उंच मूर्ती कोरली आहे.तर समोरच सुमारे ६ || फूट उंच पद्धासन असलेली सुहास्य वदन पश्चिम मुखी, अष्टभुजा आई जोगेश्वरी देवीची अतिशय सुंदर अशी कोरीव मूर्ती आहे. डोंगराच्या अखंड भिंतीतच हि मूर्ती कोरलेली आहे. जोगेश्वरी देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजुस असलेल्या खोलीत लक्ष्मीची ६ फूट उंच मूर्ती कोरली असून याच लेण्यात राम, लक्ष्मण, सीता, दत्त, वराह आदी देवतांच्या मोठमोठ्या मूर्ती कोरलेल्या आहेत.मंदिरात ४० X २० फुटांचा भव्य कोरीव मंडप असून त्यास भव्य शिल्पनक्षी असलेले खांब आहेत. याच लेण्यांच्या उजव्या बाजुला एक खोली मिळून आली होती, या खोलीत शिवालय बांधण्यात आले आहे. तर या लेण्यांच्या समोरील बाजुसही ७ खोल्या कोरलेल्या आहेत.

 

कोरीव लेण्या:

जोगेश्वरी देवीच्या मंदिरासमोरील या कोरीव खोल्या असून पुर्वी यांचा उपयोग घोडे बांधण्यासाठी केला जात असे. आता याचा उपयोग भक्तांच्या निवासासाठी व स्वयंपाकासाठी केला जातो.

 

दिपमाळ:

जोगेश्वरी देवीच्या मंदिरासमोरील हि भव्य दिपमाळ आहे. या दिपमाळची उंची सुमारे ३० फूट आहे. पुर्वी यावर दिवे लावले जात असे.

 

भक्त निवास:

जोगेश्वरी देवीच्या मंदिराच्या वरच्या बाजुला भक्तांच्या सुविधेसाठी तळमजला असलेले भव्य दुमजली भक्त निवास व विश्रामगृह संस्थानाच्या वतीने बांधण्यात आलेले आहे.

संपर्क

श्री जोगेश्वरी देवी संस्थान, घाटनांद्रा. (रजि. नं. ए. २१७८)
       ता. सिल्लोड, जि. छत्रपति संभाजीनगर, महाराष्ट्र. पि. कोड ४३१११३.

मो: ९४२१४०२२१३, ९९२३०१४६६७

ई-मेल: jogeshwarideviorg@gmail.com

ई-मेल नोंदणी


श्री जोगेश्वरी देवी बद्दलची नवीन माहिती या ई-मेल द्वारे तुम्हाला पुरवली जाईल.

 

© Copyright 2018. All Rights Reserved.